सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शन केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. आंदोलनकर्ते तिथं पोहोचण्याआधीच पोलिसांनी गिरगावात मोर्चा अडवला.
Site Admin | November 10, 2025 3:06 PM | Maharashtra Congress
फलटण इथल्या महिला डॉ. आत्महत्या प्रकरणी मुंबईत युवक काँग्रेसचं निदर्शन