October 28, 2025 8:09 PM | Mumbai Climate Week

printer

मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषदेचं आयोजन

पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशनही केलं.  १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईत होणाऱ्या या परिषदेत ३०हून अधिक देशातले पर्यावरण तज्ञ आणि अभ्यासक सहभागी होतील असा अंदाज आहे.