मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना उद्यापासून विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, आजारपणाचा इतिहास इत्यादी माहिती सहज नोंदली जाणार आहे.

 

मुंबईतल्या १७७ रुग्णालयांमधे ही सेवा उद्यापासून उपलब्ध असेल. या महिनाअखेरीपर्यंत ही सुविधा महानगरपालिकेची प्रसूतीगृह आणि वैद्यकीय महाविद्यालयं तसंच आपला दवाखानामधेही उपलब्ध होईल.