इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे मुंबई शहरात हवेची गुणवत्ता बिघडली, असं कारण देता येणार नाही, कारण त्याआधीपासूनच मुंबईत हवेचा दर्जा खालावलेला होता, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आज नोंदवलं. मुंबईतल्या प्रदूषणाबद्दल २०२३पासूनच्या याचिकांवर सुनावणी घ्यायची विनंती मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठाला आज वकिलांनी केली. सुनावणीदरम्यान, ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल, असं पीठानं विचारलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे.
दरम्यान वायू प्रदुषणाला कारणीभूत असलेल्या ५३ बांधकामांना मुंबई महापालिकेनं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.