मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉरच्या दुतर्फा ध्वनी रोधक बसवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत ८७ किलोमीटर अंतरापर्यंत ध्वनीरोधक बसवले गेले आहेत. यात १ लाख ७५ हजार ध्वनीरोधक गुजरातमध्ये बसवण्यात आले आहेत. ध्वनीरोधकांच्या निर्मितीसाठी सुरत, आनंद आणि अहमदाबादमध्ये तीन कारखाने उभारण्यात आले आहेत. ट्रेनमुळे होणारा आवाज कमी करणं हा हे ध्वनीरोधक बसवण्याचा हेतू आहे. हे ध्वनीरोधक एक मीटर रुंद, दोन मीटर उंच आणि आठशे ते साडे आठशे किलो वजनाचे काँक्रीट पॅनल्स आहेत. यामुळे ट्रेन, ट्रेनचा खालचा भाग, चाकं यामुळे होणारा गोंगाट कमी होण्यास मदत होईल.
Site Admin | September 10, 2024 3:12 PM
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉरच्या दुतर्फा ध्वनी रोधक बसवण्याचं काम सुरू
