२६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात सुनावणी

मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा यानं आपलं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण न करण्याविषयी केलेल्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे. याआधीही राणा यानं न्यायमूर्ती एलेना कागन यांच्याकडे यासंदर्भातला अर्ज केला होता, पण तो फेटाळला होता. त्यानंतर राणा यानं आता पुन्हा एकदा थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे अर्ज केला आहे.

 

राणा याचा हा नवा अर्ज ४ एप्रिल २०२५ रोजी न्यायाधीशांच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिली गेली आहे. 

 

तहव्वूर राणा हा २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीचा साथीदार असून तो सध्या अमेरिकेत लॉस एंजेलिस इथल्या तुरुंगात कैदेत आहे.