राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. या प्रकल्पांमुळे राज्यातल्या ३ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ५ दशांश मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ ते १० किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे करता धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
Site Admin | June 24, 2025 8:06 PM | CM Devendra Fadnavis
राज्यात १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री
