डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाअंतर्गत पुणे धानोरे जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय शाळा गटात पुणे विभागातल्या धानोरे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या एनएमएमसी शाळा क्रमांक ५५, आंबेडकर नगर या शाळेनं दुसरं, तर गडचिरोलीतल्या जवाहरलाल नेहरू एन. पी. प्राथमिक शाळेनं तिसरं पारितोषिक मिळवलं आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली आणि सर्व विजेत्यांचं अभिनंदन केलं. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. राज्यात मागच्या वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवलं जात आहे.