डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 24, 2025 6:39 PM | Mukul Dev

printer

अभिनेते मुकुल देव यांचं निधन

हिंदी चित्रपटातले अभिनेते  मुकुल देव यांचं काल रात्री मुंबई इथं निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. मुकुल यांचे भाऊ अभिनेते राहुल देव यांनी समाजमाध्यमाद्वारे मुकुल यांच्या निधनाची माहिती दिली. दिग्दर्शक हंसल मेहता, अभिनेता सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश, अभिनेत्री सुष्मिता सेन, कंगना रनौत यांनी मुकुल देव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 

 

सन ऑफ सरदार, आर राजकुमार, जय हो या चित्रपटातल्या मुकुल यांच्या भूमिका गाजल्या होत्या. दिल्ली इथं उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा