डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दक्षिण काश्मीरला राजौरी आणि पूँछ भागाला जोडणारा मुघल मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

जम्मू काश्मीरमधे नव्यानं झालेल्या हिमवृष्टीनंतर, दक्षिण काश्मीरला राजौरी आणि पूँछ भागाला जोडणारा मुघल मार्ग आणि बांदिपोरा- गुरेझ मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सोनमर्गमधे झालेल्या हिमवृष्टीमुळे काल सोनमर्ग- कारगील राष्ट्रीय महामार्गही बंद केल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली. हवामानात सुधारणा झाल्यावर बंद रस्त्यांवर साठलेला बर्फ काढला जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मात्र सुरू आहे.
तामिळनाडूत चेन्नई, तिरूवल्लूर, कांचिपूरम आणि चेंगलपेट इथं आणखी काही दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.