February 19, 2025 8:52 PM | Muda | Siddhramayya

printer

MUDA: पुरावे नसल्यानं घोटाळा सिद्ध होत नसल्याचा लोकायुक्त पोलिसांचा अहवाल

मुडा अर्थात म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीन वाटप प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी पार्वती आणि इतरांविरोधात पुरेसे पुराव नाहीत. त्यामुळं घोटाळा झाल्याचं सिद्ध करता येत नसल्याचं कर्नाटकातल्या लोकायुक्त पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी चौकशीचा अंतरिम अहवाल त्यांनी उच्च न्यायालयात सादर केला. अंतरिम अहवाल सादर केला तरी चौकशी सुरूच राहणार आहे. सक्तवसुली संचलनालयही याप्रकरणाची चौकशी करत आहे.