डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 28, 2025 7:05 PM | MSRTC | ST Bus

printer

एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेत पत्रिका काढण्याचे परिवहनमंत्र्यांचे आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसंच भविष्यातल्या नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते. 

 

सुमारे १० हजार कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळतं? किती खर्च येतो? किती देणी बाकी आहेत, या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी श्वेतपत्रिका काढून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे, असं सरनाईक म्हणाले. 

 

सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा आणि वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी वैद्यकीय वीमा योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्याकरता एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या ५ तज्ञांची नियुक्ती करण्याच्या सूचना सरनाईक यांनी या बैठकीत दिल्या. 

 

१ हजार ३१० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रकरणाची चौकशी  तटस्थ व्यक्ती मार्फत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा