डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 4, 2025 2:40 PM | Maharashtra | MSRTC

printer

मालकीच्या जागांवर इंधन विक्री सुरू करणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या २५०पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डीझेलबरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असतील. 

 

दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एस टी महामंडळानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी रकमेनुसार पाच ते ४८ हप्त्यांमध्ये प्रदान केली जाणार आहे.