शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी, या उद्देशाने ही हेल्पलाईन सुरु केली जाईल. तसंच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असंही सरनाईक यांनी सागितलं. बस उशिरा सुटणं, रद्द होणं अशा कारणांमुळे मुलांचं शालेय नुकसान झाल्यास आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाईल, असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | November 22, 2025 7:16 PM | MSRTC
शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती