डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 3, 2024 1:27 PM | MSME Ministry

printer

खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ५५ हजार कोटी रुपयांच्या वर

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं सूतकताई कामगार आणि हातमाग विणकरांच्या वेतनात वाढ केली आहे. त्यानुसार आता सूतकताई कामगारांना २५ टक्के तर हातमाग विणकरांना ७ टक्के अधिक वेतन मिळेल. गेल्या १७ सप्टेंबरला जाहीर झालेला हा निर्णय कालपासून लागू झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयुक्त मनोज कुमार यांनी सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खादी उद्योगातल्या कामगारांच्या वेतनात एकूण २१३ टक्के वाढ झाली आहे.त्यामुळे या क्षेत्रातल्या कामगारांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असल्याचं ते म्हणाले.  खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या वर गेल्याची माहिती त्यांनी दिली.

 

ग्राहकांना खादी उत्पादनांवर २० टक्के तर ग्रामोद्याग उत्पादनांवर १० टक्के सवलत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  आजपासून सुरु झालेला हा सेल येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.