MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमधे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश  त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता येत्या १ डिसेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे.