MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केला. या अंतर्गत ९३८ पदांसाठी ४ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होईल. यासाठी ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल.
यात उद्योग निरीक्षक संवर्गातली ९ पदं, तांत्रिक सहायक संवर्गासाठी ४ पदं, कर सहायक संवर्गासाठी ७३ पदं, तसंच लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी ८५२ पदांचा समावेश आहे. विविध श्रेणीत १८ ते ४३ वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयोमर्यादेची अट आणखी शिथिल आहे.