राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढं ढकलण्यात आली असून ती आता येत्या ९ नोव्हेंबरला होईल. राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्यामुळे, ही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी शासनाकडे होत होती. त्यानुसार राज्यसरकारने आयोगाला विनंती केल्यामुळे हा बदल झाला आहे.
९ नोव्हेंबरला गट – ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती. ती या बदलामुळे पुढं ढकलली असून त्याची सुधारित तारीख नंतर जाहीर करु, असं लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.