सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध केली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या लष्कराला भविष्यवेधी  ठेवण्यासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या बासष्टाव्या एम फिल दीक्षांत समारंभात बोलत होते. आताचं युद्ध पूर्वीसारखं केवळ जमीन, पाणी आणि आकाशापुरतंच मर्यादित राहिलं नसून सध्या अशी युद्धं माहिती अर्थात डेटा च्या जोरावर आणि सायबर जग तसंच अवकाशात देखील लढली जात आहेत, असं राजनाथ सिंह म्हणाले.  भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधाराने लष्करी डावपेचांमधलं विश्लेषण अधिक अचूक होऊ शकतं असंही ते म्हणाले.