डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 24, 2025 3:57 PM | Nitin Gadkari

printer

ॲडव्हान्टेज विदर्भ महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार- नितीन गडकरी

नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ २०२५ या औद्योगिक महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

तसंच ६७० कोटी रुपयांचा मदर डेअरी चा प्रकल्प लवकरच नागपुरात सुरु होणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. हा महोत्सव ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. विदर्भाच्या औद्योगिक वाढीसाठी एक प्रमुख गुंतवणूक स्थळ म्हणून प्रोत्साहन देणं, बाजाराचा कल, आणि उदयोन्मुख संधींवर चर्चा केली जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.