डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. रिलायन्स सोबत झालेल्या या करारातून ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळं राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य ९ लाख ३० हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

याशिवाय ह्युंदाई, डीपी वर्ल्ड, सिस्को, ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, NTT DATA या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली. या कंपन्यांही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत.