August 14, 2024 7:27 PM

printer

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रात प्रभावी सेवा देण्यासाठी डीजीटल आरोग्य शिक्षणाला चालना देणारा करार नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात झाला.

 

नवी दिल्ली इथे झालेल्या कराराच्या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा तसंच आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल माधूरी कानिटकर आदी मान्यवर उपस्थीत होते.

 

वैद्यकीय अभ्यासक्रमात डिजीटल आरोग्य शिक्षणांची महत्वाची भूमिका असून या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढीला लागेल, असं मत यावेळी नड्डा यांनी व्यक्त केलं तर डिजीटल आराेग्य समजून घेऊन त्याचा रूग्णसेवेत वापर करणं ही आजच्या काळाची गरज आहे, असं आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु माधूरी कानिटकर यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.