संरक्षण मंत्रालयानं आज दिल्लीत क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश ६३ लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवृत्ती वेतन , आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि गुणवत्ता सेवा बळकट करणं हा आहे. या सामंजस्य करारांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल मूल्यमापन तसंच पुराव्यावर आधारित धोरणांच्या शिफारशी करण्याच्या कामात क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया मदत करेल.
माजी सैनिक कल्याण विभाग राज्य सरकारं, जिल्हा सैनिक मंडळे, सैन्य दल मुख्यालयं आणि मान्यता प्राप्त रुग्णालयं यांच्या सोबत समन्वय साधण्याच्या कामात मदत करेल. या उपक्रमातून आरोग्यसेवा वितरण मजबूत होण्याबरोबर माजी सैनिकांसाठी पुनर्रोजगार उद्योजकतेच्या संधी वाढायला मदत होणार आहे. तसंच विभागाचा संस्थात्मक आराखडा बळकट व्हायला मदत होईल.