September 10, 2024 9:40 AM

printer

मुंबई, ठाणे आणि पालघरमधून अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने कोकणात दाखल

यावर्षी गणपती उत्सवासाठी गेल्या पाच दिवसांत, मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात रवाना झाले आहेत. 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात झालेला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब अशा अडचणींवर मात करत एसटी प्रशासनानं सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा सुमारे पाच हजार गाड्यांच्या माध्यमातून या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली.