यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणाचे आदेश सरकारने काढले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी साडे ७ हजार कोटींच्या मदतीच्या वितरणाला मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
Site Admin | October 19, 2025 10:09 AM | Farmer | Flood | Maharashtra | Rain
पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी
