गाझापट्टीत पुकारलेल्या युद्धात आत्तापर्यंत ४० हजार ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु

गाझा पट्टीतल्या खान युनिस आणि डेर अल बलाह या शहरांच्या अनेक भागांमध्ये कामगिरी पूर्ण केल्यानंतर इस्रायलचं सैन्य इथून माघारी फिरल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे. खान युनिस शहरातल्या काही भागांना आता मानवतावादी प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली असून या भागातले रहिवासी आणि विस्थापित झालेले पॅलेस्टाइनचे नागरिक इथं परत येऊ शकतात, असं इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते अविचाइ आद्राइ यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासनं दक्षिण इस्रायलवर हल्ला करून १२०० नागरिकांना मारल्यानंतर इस्रायलनं गाझापट्टीत पुकारलेल्या युद्धात आत्तापर्यंत ४० हजार ६००पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.