छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्यांच्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्रारंभी ब-याच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि ताप असा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्याच वेळानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सदर बिस्कीटांचे नमुने आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी देण्यात आले आहेत.