September 8, 2024 8:22 PM

printer

७व्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत देशभरात १ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्यावतीनं आयोजित ७व्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत सातव्या दिवसापर्यंत देशभरात १ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित २० लाखापेक्षा जास्त उपक्रमांचा समावेश होता असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या या सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, ३५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ७५६ जिल्ह्यांनी जनजागृती मोहिमा, तसंच पोषण विषयक जागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.