विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. विधिमंडळाचं यापुढचं, हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १५ बैठका झाल्या यात १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. अधिवेशन काळात १४ विधेयकं पुनर्स्थापित झाली, तर १५ विधेयकं संमत झाली. एक विधेयक मागं घेण्यात आलं. अधिवेशनात विधानसभा सदस्यांची उपस्थिती ८२ दशांश २३ टक्के इतकी राहिली.
विधानपरिषदेच्या १५ बैठका झाल्या, त्यात एकंदर १०५ तास, म्हणजे दररोज सरासरी ७ तास चर्चा झाल्याचा माहिती सभापती राम शिंदे यांनी कामकाज संपवताना दिली. मंत्री उपस्थित नसल्यामुळे १ तास २ मिनिटं, तर इतर कारणांमुळे ४४ मिनिटं, इतका वेळ वाया गेल्याचंही त्यांनी सांगितलं.