डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा

राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केली. पहलगाममधे दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना काल यश आलं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून स्वसंरक्षणासाठी होती, असं राजनाथ सिंह म्हणाले. 

 

त्याआधी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर पुकारला, मात्र विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी बिहार मतदार यादी सखोल पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा घ्यायची मागणी करत सभागृहात गदारोळ केला. विविध राजकीय पक्षांकडून एकंदर २४ स्थगन प्रस्ताव मिळाल्याची आणि ते फेटाळल्याची माहिती उपाध्यक्षांनी सभागृहाला दिली. गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.