आज विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांना मारहाण झाल्याचे मुद्दे दोन्ही सभागृहांमधे पुढं आले. आपल्याला मारण्यासाठी काही लोकांना बाहेरून आणलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तर, आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानभवनाच्या लॉबी मध्ये धक्काबुक्की करण्यात आली, त्याबाबत कारवाई करण्याची मागणी संजय उपाध्याय यांनी सभागृहात केली, ती तातडीनं करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. या प्रकरणी सना मलिक, रोहित पवार, मंत्री आशिष शेलार यांनी देखील चिंता व्यक्त केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरात मारहाण झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत दिली. याची माहिती घेऊन त्वरित कारवाई करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले.