नैऋत्य मौसमी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल

नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय  झाला आहे. 

 

या पार्श्वभूमीवर केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड लर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. 

 

राज्यात आज मराठवाड्यासह, विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात नांदेडसह लातूर आणि विदर्भात बुलडाणा, मध्य महाराष्ट्रात पुणे तसंच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात यलो लर्ट देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट-वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.