डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 18, 2024 7:51 PM | monkeypox

printer

केरळमध्ये एका रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण

केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातल्या मंजेरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. हा रुग्ण दुबईहून आल्यानंतर चाचणी करण्यात आली, त्यानंतर या संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केरळ राज्य सरकारने सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना केली असून नोडल वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत.