आपापलं वेगळेपण बाजूला ठेवून संघाचे विचार स्वीकारले तर सर्व धर्माचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येऊ शकतात, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. तसंच जे हिंदू भारत मातेसमोर नतमस्तक होतात, अशा हिंदूनाच आरएसएसमधे स्थान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुस्लीम धर्माच्या मुलांसाठी आरएसएस शाळा सुरू करणार आहे का असं विचारलं असता एका विशिष्ट जात किंवा धर्मासाठी आरएसएस शाळा चालवत नसल्याचं भागवत म्हणाले.