क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यानं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने तेलंगणा इथं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला. सिराज आणि मुष्टियोद्धा निखत जरीन यांनी आपापल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा तेलंगणा सरकारने दिली होती. त्यानुसार आज सिराज याने उप अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. या नोकरीसह सिराज भारतीय क्रिकेट संघातही खेळू शकणार आहे.