शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन्ही पक्ष मुंबई, नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र येऊन लढवणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. याशिवाय मुंबईतल्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या कामगार सेनांचा संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा मेळावा काल झाला. याशिवाय इतर कर्मचारी संघटनांचं सहकार समृद्धी पॅनेललही रिंगणात आहे.
Site Admin | August 15, 2025 8:28 PM
महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढवणार
