मुंबई महानगर क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रातलं दळणवळण, पायाभूत सुविधा, आणि आर्थिक विकास वाढवण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असंही ते म्हणाले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणूक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित प्रारुप आराखडाही यावेळी मंजूर झाला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.