डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी वॉशिंगटनमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्टोफर लँडौ यांच्यासोबत त्यांनी दोन्ही बाजूंच्या द्विपक्षीय मुद्द्याचा आढावा घेतला. अमेरिकेचे संरक्षण उप-सचिव स्टीव्ह फेनबर्ग आणि धोरणविषयक विभागाचे उप-सचिव एल्ब्रिज कोल्बी यांच्यासोबतच्या बैठकींमध्ये दोन्ही देशांनी मजबूत आणि दूरदर्शी संरक्षण भागीदारीसाठी वचनबद्धता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव मिसरी यांनी ट्रेझरी उप-सचिव मायकल फॉकेंडर यांच्यासोबत आर्थिक संबंध वाढवण्यावर चर्चा केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये सहकार्य आणि आगामी वित्तीय कृती कार्य दलाच्या प्रक्रियांमध्ये समन्वय यांचा समावेश आहे. त्यांनी अमेरिकेचे वाणिज्य उप-सचिव जेफ्री केसलर यांच्यासोबत द्विपक्षीय व्यापार कराराच्या प्रगतीचाही आढावा घेतला. परराष्ट्र सचिवांचा वॉशिंग्टनचा तीन दिवसांचा दौरा गुरुवारी संपला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा