युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू केलं आहे. डिजिटल सहभाग वाढवणं आणि तरुणांसाठी सेवा सुलभ करण्यासाठी हा या मागचा उद्देश आहे. ७-२-८-९-०-०-१-५-१-५ या व्हाट्सएप क्रमांकाद्वारे माय भारत पोर्टलवर व्हाट्सॲप चॅटबॉटने संवाद साधता येणार आहे. व्हॉट्सॲपद्वारे माय भारत सेवांमध्ये सोयीस्कर प्रवेश, जलद ऑनबोर्डिंग, कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि अर्जांची पाठपुरवठा, रिअल-टाइम अपडेट्स आणि सुलभ समस्या अहवाल आणि निराकरण हे चॅटबॉटचे काही प्रमुख फायदे आहेत.