December 5, 2024 7:31 PM

printer

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज नवी दिल्लीत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित केले. 

 

या अहवालामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीविषयीची आकडेवारी समोर येते आणि त्याद्वारे मेक इन इंडियासारख्या उत्पादक प्रोत्साहन आणि कौशल्य विकास धोरण निर्मितीत मदत होते. असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत यांनी यावेळी सांगितलं.