जुन्या प्रदूषणकारी गाड्या भंगारात काढून नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासंदर्भात बैठक

जुन्या प्रदूषणकारी व्यवसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्याजागी नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काल दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. भारत मंडपम् इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी भारतीय स्वयंचलित वाहन निर्माता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि अजय टमटा उपस्थित होते. देशभरातून भंगार गाड्या टप्प्याटप्प्यानं बाद करण्यासाठी नवी प्रणाली राबवण्याच्या हेतूनं स्वयंसेवी पद्धतीने वाहनाचे आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याचे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे धोरण नोंदणीकृत वाहन मोडीत काढण्याची सुविधा आणि स्वयंचलित चाचणी केंद्र यांच्या माध्यमातून राबवले जाईल.