नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे ओदिशात दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे उद्यापासून ओदिशात भुवनेश्वर इथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात २०३० पर्यंत ५०० गिगावॅटचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत १ हजार ८०० गिगावॅटच्या पुढील उद्दिष्टाच्या धोरणांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे.