हिन्दी वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या प्रसारणात उर्दू शब्दांचा जास्त वापर करू नये आणि भाषा तज्ञांची नियुक्ती करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याच्या बातमीचं सरकारनं खंडन केलं आहे. मंत्रालयानं कोणत्याही वाहिन्यांना असे निर्देश दिले नसून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्य शोधन विभागानं म्हटलं आहे. नागरिकांनी अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर भरवसा ठेवावा, असं आवाहन कार्यालयानं केलं आहे.
Site Admin | September 21, 2025 8:08 PM | Ministry of Information & Broadcasting
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बातमीचं सरकारकडून खंडन