डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

परराष्ट्र मंत्रालयाकडून ओसीआयबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा

भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत  नियमांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काही सुधारणा केल्या आहेत.

 

एखाद्या ओसीआय नागरिकाला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल किंवा सात वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी आरोपपत्र दाखल झालं असेल तर त्या व्यक्तीचं परदेशस्थ नागरिकत्व रद्द केलं जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

गेल्या काही वर्षांमधे ओसीआय कार्डधारक नागरिकांचा गुन्ह्यांमध्ये अथवा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर गृह मंत्रालयानं नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.