केंद्र सरकारतर्फे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणाची स्थापना

उल्फा अर्थात यूनायडेट लिबरेशन फ्रंट ऑफ असोम या संघटनेला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यासाठी पुरेशी कारणं आहेत का याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे. न्यायाधिकरण या संघटनेचे गट, शाखा आणि संबंधित संघटनांवर लक्ष ठेवणार आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मायकल झोथनखुमा हे या न्यायाधिकरणाचे प्रमुख असतील.