इराणमध्ये नोकरीची आश्वासनं किंवा तिथं नोकरी देऊ करण्याच्या प्रस्तावांबाबत सर्व भारतीय नागरिकांनी कटाक्षानं सतर्कता बाळगावी असा सावधगिरीचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिला आहे.
भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याची खोटी आमिषं दाखवून किंवा तिथून अन्य कुठल्या तरी देशात नोकरीसाठी पाठवलं जाईल अशी आश्वासनं देऊन भुलवलं जातं. इराणमध्ये पोहोचल्यावर त्यांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण केलं जातं आणि नंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबाकडे खंडणी मागितली जाते. अशी बरीचं प्रकरणं अलीकडे घडल्याच्या पार्श्र्वभूमीवर अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे.