निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रीय जनधन खात्यांच्या संख्येवर मंत्रालयाची देखरेख असून संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांची खाती कार्यरत ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | July 9, 2025 9:49 AM | Ministry of Finance
निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे निर्देश बँकांना नाहीत – अर्थ मंत्रालय
