भारत निर्मित ‘आकाश’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी ६ ते ७ देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत ‘आकाश’, ‘पिनाक’ आणि १५५ mm तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि युएई या देशांनी देखील आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत रस दाखवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश क्षेपणास्त्राच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवणं सुलभ झालं, आणि ते जगानं पाहिलं आहे. आखाती देश, आसियान भागातील राष्ट्रं आणि इतर बाजारपेठांमध्ये आकाशची मागणी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाजही संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.