डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 2, 2025 8:24 PM

printer

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी कार्यगटाची स्थापना 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०११ -१२ च्या ऐवजी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर १८ सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या सदस्य डॉ. शमिका रवी, क्रिसिल या पतमानांकन संस्थेचे मुख्य अर्थतज्ञ डॉ. धर्मकीर्ती जोशी यांचा त्यात समावेश आहे. घाऊक किंमत निर्देशांक ठरवताना लक्षात घेण्याच्या वस्तूंची यादी आणि मोजणीची पद्धत पुन्हा तयार करण्याचं काम हा कार्यगट करेल. देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या रचनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीत सुधारणा केली जाईल. या कार्यगटाने येत्या १८ महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार कार्यालयाकडे अहवाल सादर करायचा आहे.