डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 19, 2024 8:36 PM | Ministry of Coal

printer

औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध – कोळसा मंत्रालय

देशात कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेची मागणी यावर्षी ७ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढली असून, देशातल्या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये साडे चार कोटी टन इतका कोळसा उपलब्ध आहे. तर देशातला एकूण कोळसा साठा साडे चौदा कोटी मेट्रिक टनांहून अधिक असल्याचं कोळसा मंत्रालयानं सांगितलं आहे.